आर्थिकमोबाईलवर अश्लिल स्टेटस ठेवत जीवे मारण्याची धमकी ; साई मदनेविरुद्ध कारवाई करा...

मोबाईलवर अश्लिल स्टेटस ठेवत जीवे मारण्याची धमकी ; साई मदनेविरुद्ध कारवाई करा ; सौरभ सुरवसेंचं एस. पी. राकेश ओला यांना निवेदन…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथल्या वैभव सुभाष चौधरी याच्या चिथावणीवरुन साई संजय मदने या तरुणाने त्याच्या मोबाईलवर अश्लिल स्टेटस ठेवत नेवासे तालुक्यातल्या खरवंडी गावच्या सौरभ विजय सुरवसे याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौधरी आणि साई मदनेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन सौरभ सुरवसे यांनी नगरचे एस.पी. राकेश ओला यांना दिले.

सौरभ सुरवसे हा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टी इथं असलेल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. वैभव चौधरी हा सावकारकीचा व्यवसाय करतो. सौरभची आणि चौधरीची ओळख झाली.

सौरभ सुरवसेचा मित्र अथर्व दातीरला पैशांची गरज होती. म्हणून चौधरीकडून व्याजाने
एक लाख रुपये घेऊन दातीरने घेतले होते. दातीर याने पैसे दिले नाही म्हणून सावकार चौधरी याने सौरभ सुरवसेला गुंडाकरवी उचलून नेले. पैसे देण्याची तयारी दाखवल्यानंतर सुरवसेला सोडून देण्यात आले. मात्र त्यानंतर साई संजय मदने याने चौधरीच्या सांगण्यावरुन अश्लिल स्टेटस

ठेवले. इंग्लिशमध्ये असलेले हे स्टेटस सुरवसेच्या आईची बदनामी करणारे असून मदनेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या