अहिल्यानगर'या' मल्टीस्टेटच्या संस्थापकाची अवस्था 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' ; गुंतवणूकदारांनो, 'डिपॉझिट' करताना...

‘या’ मल्टीस्टेटच्या संस्थापकाची अवस्था ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान…’ ; गुंतवणूकदारांनो, ‘डिपॉझिट’ करताना काळजी घ्या…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. ही म्हण ज्याला तंतोतंत लागू पडते, ती व्यक्ती स्वतः प्रचंड भ्रष्ट चारित्र्याची असते. मात्र जगाला उपदेशाचे डोस पाजळायला ती सर्वात पुढे असते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध भागांत ज्या एका मल्टीस्टेटच्या अनेक शाखा आहेत, त्या मल्टीस्टेटच्या संस्थापकाची अवस्था म्हणजे ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान’ अशाच प्रकारची आहे. त्यामुळे या मल्टिस्टेटमध्ये ‘डिपॉझिट’ करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन मुद्दामहून आम्ही करत आहोत.

या मल्टीस्टेटच्या संस्थापकाने नाथ संप्रदायातल्या एका नाथ भक्त असलेल्या बाबाची संपत्ती गोड बोलून लाटली आणि लुटली. त्या नाथ भक्ताचा अक्षरशः केसानं गळा कापला. एका मोठ्या आणि दिग्गज नेत्यानं डोळे झाकून याच्याकडे ठेवलेल्या ‘मनी लॅन्ड्रींग’च्या कोट्यवधी रुपयांवरही डल्ला मारत त्या नेत्याचासुद्धा केसानं गळा कापला. परिणामी मल्टीस्टेटच्या त्या संस्थापकाचा मुलगा प्रचंड नशेबाज आणि जुगारी निघालाय. बापाने कमविलेली इज्जत आणि विश्वासार्हता मातीत मिसळवण्याचा एक प्रकारे विडाच या बिघडलेल्या पोरानं उचललाय. विशेष म्हणजे  मल्टीस्टेटच्या कुठल्याही शाखेत त्याला अजिबात प्रवेश देण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती आली आहे.

मल्टीस्टेटचा हा संस्थापक त्याच्या जावयालादेखील फार दिवस जवळ करत नव्हता. मात्र लेकीच्या प्रपंचाचा विचार करुन त्या जावयाला नाविलाजास्तव
एका शाखेत ‘चिकटवून’ देण्यात आलं. मित्रांनो, दिवा जितका मोठा असतो, तितका त्या दिव्याखाली जास्त अंधार असतो. मल्टीस्टेटच्या या संस्थापकाची ही दयनीय अवस्था नेमकं हेच दाखवते आहे.

मोठ्या प्रमाणात ‘डिपॉझिट’ जमा असल्यामुळे या मल्टीस्टेटमध्ये फारसा गोंधळ उडाल्याचं समोर येत नाही. मात्र या मल्टीस्टेटमध्ये किती कोटींच्या ठेवी आहेत आणि किती कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे, या मल्टीस्टेटचं लायसन नक्की कोणतं आहे, या मल्टीस्टेटचं संचालक मंडळ कोणतं आहे, या संचालक मंडळात कोणाकोणाची वर्णी लावण्यात आलेली आहे, या मल्टीस्टेटचा एनपीए किती आहे, भाग भांडवल, गंगाजळी किती आहे, या मल्टीस्टेटचा ताळेबंद कधी सादर केला जातो, या मल्टीस्टेटच्या खरोखर (कागदोपत्री नव्हे) इतर कोणकोणत्या राज्यांत शाखा आहेत, या मल्टीस्टेटने ताळेबंद, तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक कधी जाहीर केलंय, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सदर मल्टीस्टेटच्या संस्थापकाकडे अजिबात मिळणार नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जरा सावधानता बाळगावी, हेच या निमित्तानं सांगावसं वाटतं. धन्यवाद.

आणखी महत्वाच्या बातम्या