रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
नगर तालुक्यातल्या ‘त्या’ तरुणानं मल्टीसिटीच्या नावानं अनेकांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्यानंतर आता बेरोजगार तरुणांना गंडा घालण्याचा त्याचा विचार दिसत आहे. यामध्ये कोणाचीही आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही (रोखठोक 24 न्युज नेटवर्क) अनेकांची नाराजी ओढवून घेत असं जाहीर आवाहन करत आहोत, की युवा मित्रांनो, सावधान. ‘आरोग्यदूत’च्या नादाला न लागता तुम्ही तुमची आर्थिक फसवणूक टाळा.
या तरुणानं नगर शहरातल्या व्हॉटसअप मिडियाला
आरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन लिमिटेड, नवीदिल्ली अशा कंपनीच्या नावाखाली नोकरीच्या जाहिराती देवून तरुणांना एक वेगळं ‘गाजर’ दाखवलं आहे. कोणाचीही आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आरोग्यदूत होऊ इच्छित असलेल्या तरुणाला 12 हजार 500 रुपये पगार आणि विमा अशी आमिषं दाखवून 950 रुपये प्रवेश फी संपूर्ण महाराष्ट्रातून उकळून कोट्यवधी रुपये कमविण्याचा विचार हा तरुण करत आहे.
यापूर्वी 25 मल्टीसिटी निधीच्या बोगस कंपन्या टाकून गंडा घातलेला आहे. सदर तरुणाचे उद्योग अजूनही सुरुच आहेत. कोटक बँकेत खाते उघडून हा तरुण ऑनलाईन पद्धतीनं 950 फी उकळत आहे.
या तरुणानं आरोग्यदूतचं कार्यालय नवीदिल्लीत थाटून आर्थिक लुटीच्या हा नवीन धंदा सुरु केला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांत तसेच प्रत्येक नगरपरिषद, महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मानधन तत्त्वावर आरोग्यदूत नेमणे आहे, अशी जाहिरात या तरुणानं दिली आहे. कोणीही या फसव्या जाहिरातीला बळी नये, यासाठी एक जनजागृती करण्याच्या उद्देशानं आम्ही संबंधित तरुणाचा रोष पत्करुन यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन आम्ही पुन्हा एकदा सर्व युवा मित्रांना करत आहोत.