अहिल्यानगररस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचा संदेश कार्ले यांचा निर्धार...!

रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचा संदेश कार्ले यांचा निर्धार…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

नगर – पारनेर मतदारसंघात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरदेखील पायाभूत सुविधांचा अभाव आहे. ही बाब ओळखून या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असलेले अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी या मतदारसंघात पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचा निर्धार रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केलाय.

अहिल्यानगरजवळच्या नवनागापूर, चेतना कॉलनी या परिसरात प्रचारफेरीदरम्यान ते बोलत होते. युवा मतदारांसह सर्वच मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रचारादरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना कार्ले यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची जाणीव झाली.

निवडून आल्यानंतर सर्वप्रथम या प्रश्नावर काम करण्याचं मनोगत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या