अहिल्यानगर काय किंवा अहमदनगर काय? असं नाव बदलून जरी म्हटलं तरी या शहराच्या समस्या कमी होणार आहेत का? साडेपाचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शहराचा संस्थापक असलेल्या अहमद निजामशहाच्या समाधीस्थळाकडे जाणारा या शहराचा नाव बदलल्यामुळे रस्ता प्रशस्त होणार आहे का? या नामांतरामुळे नगरच्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न मार्गी लागणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न या शहराचे नाव बदलल्याने सुटणार आहेत का?
खरं तर या महापालिका हद्दीत समस्यांचा डोंगर झाला आहे. त्या डोंगराएवढ्या समस्यांचा रोखठोक 24 न्युज नेटवर्कनं घेतलेला हा मागोवा…!
नगर शहरातले खऱ्या अर्थानं जागरुक असलेले जागरुक नागरिक कृती मंचचे संस्थापक अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी नगरच्या या समस्यांविषयी रोखठोक 24 न्युज नेटवर्कशी बोलताना सविस्तरपणे भाष्य केलंय. नगरला सुदैवानं सहसा कुठलीही नैसर्गिक आपत्ती जसं की, अतिवृष्टी, भूकंप, महापूर आदी नैसर्गिक समस्या भेडसावत नाहीत. त्यामुळे इथलं आपत्ती व्यवस्थापन आनंदात असलं तरी ते आपत्ती व्यवस्थापनच आपत्तीत सापडलंय, असं मिश्किल टिपण्णी मुळे यांनी केली आहे. तुम्हीच पहा आणि ऐका, काय म्हणाले मुळे.
‘पाहुण्याचा मेव्हणा, मेव्हण्याचा पाहुणा’ हेच ठेकेदारीचं गमक असल्याचं का म्हणाले असतील सुहास भाई मुळे? शौचालयांची अत्यंत दुरावस्था असतानादेखील या महापालिकेला स्वच्छतेसाठी पाच कोटींचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तुम्हीच पहा आणि ऐका
नगर शहरातले 41 ओढे नाले गायब झाले आहेत. यावर भाष्य करताना मुळे यांनी एक ‘ओपन सिक्रेट’ सांगितलंय. काय आहे ते ‘ओपन सिक्रेट’? पहा बुवा तुम्हीच…!
तुम्ही सर्व नगरकर आहात आणि एक नगरकर म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की बस्स् झालं तुमचं हे संयमीपणाचं नाटक. अहो, पुण्याच्या सदाशिव पेठेतली सभ्य माणसं प्रशासनाला सभ्य भाषेत का होईना, जाब विचारु शकतात. तुम्ही तर स्वाभिमानी, कडवट ‘नगरी’ आहात…! तुमच्या कष्टातून तुम्हाला आर्थिक जे उत्पन्न मिळतं, त्यातला काही वाटा तुम्ही नगरच्या महापालिकेला संकलित कर भरताय ना? मग असं मूग गिळून का गप्प बसला आहात? चुकत असलेल्या प्रशासनाला जाब विचारायला तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार आहात? नगरकरांनो ! उठा, खडबडून जागं व्हा आणि चुकत असलेल्या प्रशासनाचा ‘सत्कार’ करायला सज्ज व्हा. धन्यवाद.