रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
संपूर्ण राज्यात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांडातले साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना या गुन्ह्यातला ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेचा भाऊ अनुपम बोठे यानं ‘पाहून घेऊ’, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी डॉ. मकासरे यांच्या तक्रारीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. मकासरे हे राहुरी बसस्थानक येथे असताना ९०५०५२०५०० या मोबाईलवरुन त्यांना धमकीचे फोन आल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं असून २६ जूलै २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत डॉ. मकासरे यांच्या ८९७५४००४०० या मोबाईलवर धमक्यांचे फोन आले आहेत.
डॉ. मकासरे यांना धमकी देणाऱ्या इसमाचं नाव अनुपम बोठे असून रेखा जरे हत्याकांडात बाळ बोठेविरुद्ध केसमध्ये आमच्या बाजूनं साक्ष द्या. नाही तर पाहून घेऊ, अशी धमकी दिल्याचं डॉ. मकासरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे.
… तरीही साक्ष बदलणार नाही…!
मयत रेखा जरे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न करणार आहे. या हत्याकांडाचा ‘मास्टमाईंड’ बाळ बोठे याच्या भावानं म्हणजे अनुपम बोठेनं केलेले फोन कॉल्स, मेसेजेस यांचे सर्व डिटेल्स न्यायालय आणि पोलीस अधीक्षकांना यांना भेटून दिलेले आहेत. त्यावर लवकरच कारवाई करु, असंही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितलं आहे. न्यायालय आणि पोलिस अधीक्षक यांना मी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या हत्याकांडात मला
कितीही धमक्या आल्या तरीही मी साक्ष बदलणार नाही, अशी भूमिका डॉ. मकासरे यांनी ‘रोखठोक’शी बोलताना स्पष्ट केलीय.