अहिल्यानगरलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घोडेगावात विशेष कार्यक्रम...!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घोडेगावात विशेष कार्यक्रम…!

Published on

spot_img

असामान्य व्यक्तिमत्त्व, अमौलिक प्रतिभा, परखड लिखाणासह वस्तुस्थितीची जाणीव करुन देणारे, वेळप्रसंगी सत्ताधारी यंत्रणेला जाब विचारणारे आणि ‘आमच्या सत्तेचा  वाटा कुठं हाय रं’ अशी स्वाभिमानी विचारणा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेवासे तालुक्यातल्या घोडेगावात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

प्रारंभी हॉटेल लिलियम पार्क उद्योग समुहाचे संस्थापक सुरेश (अण्णा) शेटे पाटील आणि सहकाऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी बोलताना उद्योजक सुरेश शेटे पाटील म्हणाले, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी आणि शाहीरी आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. समाज भान ठेवत समाजाला अन्यायविरुद्ध खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांनी जागं केलं. या महापुरुषाचे विचार आपण खरं तर आचरणात आणायला हवेत. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणी आणि शाहिरीमध्ये होती. घोडेगावच्या तरुण कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम फक्त एकच दिवस न ठेवता अनेक दिवस ठेवला. अखंड सुरु असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळ्याची घोडेगावच्या मातंग समाजातल्या युवा कार्यकर्त्यांनी अकरा दिवसानंतर सांगता केली.

अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाची घोडेगावच्या मातंग समाजातल्या युवक कार्यकर्त्यांसह अनेकांनी खऱ्या अर्थानं जाण ठेवली, याबद्दल सर्वच तरुण कार्यकर्त्यांचे शतशः आभार. भविष्यात काही अडचण असेल तर कधीही आवाज द्या.  अर्ध्या रात्री आम्ही तुमच्या हाकेला साथ देऊ. काळजी करु नका. आम्ही कायम तुमच्यासोबत सोबत आहोत’.

आणखी महत्वाच्या बातम्या