अहिल्यानगर'लोढा हाईट्स'च्या 'त्या' उपोषणात काहीच तथ्य नाही ; सतीश चोपडा यांची माहिती...!

‘लोढा हाईट्स’च्या ‘त्या’ उपोषणात काहीच तथ्य नाही ; सतीश चोपडा यांची माहिती…!

Published on

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातल्या चितळे रोड परिसरात असलेल्या लोढा हाईट्स या व्यावसायिक इमारतीत शितल पावभाजी या नावानं एक कॅन्टीन सुरु आहे. ही कॅन्टीन अतिक्रमणात असून ती पाडण्यात यावी, या मागणीसाठी पवन भिंगारदिवे यांनी उपोषण सुरु केलं होतं. मात्र या उपोषणात काहीच तथ्य नाही, अशी माहिती शितल पावभाजी सेंटरचे संचालक सतीश चोपडा यांनी रोखठोक 24 न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली. ते म्हणाले, उपोषण करणारा हा माणूस खोटं बोलत आहे. या संदर्भात ज्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्या उपोषणकर्ते भिंगारदिवे यांनी पुराव्यांसह दाखवाव्यात, असं आव्हानदेखील चोपडा यांनी दिलंय.

दरम्यान, उपोषणकर्ते भिंगारदिवे यांना नगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उपोषण न करण्याची विनंती केली. या संदर्भात महानगरपालिकेला आणखी एक पत्र देण्याचा निर्धार करत भिंगारदिवे यांनी उपोषण थांबवलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या