अहिल्यानगरलोणीच्या 'चैन स्नॅचिंग' गुन्ह्यातला आरोपी जेरबंद ; अहिल्यानगर एलसीबीची कारवाई...!

लोणीच्या ‘चैन स्नॅचिंग’ गुन्ह्यातला आरोपी जेरबंद ; अहिल्यानगर एलसीबीची कारवाई…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर 

दिनांक 15/10/2024 रोजी फिर्यादी इसराज असिफ पटेल (वय 45, रा. हसनापूर, ता. राहाता) या त्यांच्या मुलीसह घरी जात असताना फिरोज वॉच व मोबाईल सेंटर जवळ युनीकॉर्न गाडीवरून दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीचे गळयातील सोन्याची मिनी गंठण बळजबरीने हिसकावून चोरून नेले. याबाबत लोणी पोलीस ठाणे गु.र.नं. 565/2024 बीएनएस कलम 309 (4), प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घडलेल्या घटनेबाबत राकेश ओला पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत तपास पथक नेमून कारवाई करणे बाबत आदेश केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, अमृत आढाव, प्रशांत राठोड तसेच मनोज गोसावी, रमीझराजा अत्तार नेम.तपास पथक श्रीरामपूर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन, लोणी पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 16/10/2024 रोजी पोसई/धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे, रा.अशोकनगर, श्रीरामपूर याने त्याचे साथीदारासह केला असुन ते गुन्हयातील चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी कोल्हार बु.ाा ता.राहाता येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कोल्हार ते बेलापूर रोडवर, प्रथमेश ॲग्रो, कोल्हार, ता.राहाता येथे सापळा लावून दोन संशयीत इसम मोटार सायकलवर आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे, (वय 26, रा. अशोकनगर, श्रीरामपूर) व 2) अजय संजय पंडीत (वय 19, रा. निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपी नामे 1) सचिन ईश्वर भोसले याचेकडून 1,40,000/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने 2) अजय संजय पंडीत याचेकडून 80,000/- रूपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण 2,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपास पथकाने आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी दिनांक 15/10/2024 रोजी दुपारी 04.00 वा.सुमारास लोणी शहरामध्ये मोटार सायकलवरून एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने बळजबरीने ओढुन चोरी केल्याचे सांगीतले.तसेच मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता दोन्ही आरोपीतांनी दोन ते तीन महिन्यापुर्वी गोपीनाथनगर, वॉर्ड नं.2 श्रीरामपूर येथुन गुन्हयात हस्तगत केलेली मोटार सायकल चोरी केलेली असल्याचे सांगितले.

 

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, बसवराज शिवपुजे, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या