अहिल्यानगरवडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सुधार निधी योजनेचा गैरवापर ; समाज...

वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सुधार निधी योजनेचा गैरवापर ; समाज कल्याण अधिकारी कोकाटे यांनीही केलं अक्षम्य दुर्लक्ष…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक न्युज नेटवर्क / अहमदनगर

वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या लाखो रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दि. २ ऑगस्ट 2024 रोजी शासकीय विश्रामगृह निवेदन देण्यात आलं होतं.

  • त्या अनुषंगानं प्रभारी जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी समाज कल्याण अधिकारी कोकाटे यांच्याशी संपर्क साधला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्याविरुध्द ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही साळवे यांनी केली होती. परंतू समाज कल्याण अधिकारी कोकाटे यांनी यासंदर्भात पुढे काहीच कारवाई केली नाही.

दरम्यान, आगामी दिवसांमध्ये समाज कल्याण अधिकारी कोकाटे आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडारवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी दिला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून येणारा निधी स्वतःची खासगी मालमत्ता असल्यासारखा दलित वस्ती वगळता दुसरीकडे वापरण्यात आल्याचा प्रकार माजी उपसरपंच पगारे यांनी प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिला. मात्र प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केलं.

… होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी…!

वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती विकास योजनेच्या निधीचा गैरवापर करण्यात डोमकावळे मास्तर या टोपण नावानं कुप्रसिद्ध असलेला वडारवाडी ग्रामपंचायतीचा एक पदाधिकारी माजी उपसरपंच कैलास पगारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चांगलाच गडबडून गेला आहे. वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती विकास योजनेच्या निधीची जी गडबड झाली, त्या गडबडीची सखोल चौकशी करुन दूध का दूध पानी का पानी करावं, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

‘डोमकावळे मास्तर’च  आहे सर्व भ्रष्टाचाराचा ‘खलनायक’…!

स्थानिक स्वराज्य संस्थेचा एखादा पदाधिकारी त्या संस्थेतल्या भ्रष्टाचाराला कशा पद्धतीने कारणीभूत असतो, हे जर कोणाला पाहायचं असेल तर त्याने नक्कीच वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्यावी, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करावी. या चर्चेनंतर नक्कीच वडारवाडी ग्रामपंचायत दलित वस्ती विकास निधीचा गैरव्यवहार अपहार आणि भ्रष्टाचार कसा झाला आणि तो कोणी केला, याचं उत्तर नक्कीच मिळेल. क मात्र शंभर टक्के खरं आहे, की इथल्या संपूर्ण भ्रष्टाचाराचा खलनायक डोमकावळे मास्तर हाच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या