अहिल्यानगर'विकास की नैय्या संग्राम भैय्या'...! आमदार संग्राम जगताप यांची पडली अहिल्यानगरच्या नागरिकांना...

‘विकास की नैय्या संग्राम भैय्या’…! आमदार संग्राम जगताप यांची पडली अहिल्यानगरच्या नागरिकांना भुरळ…!

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

क्रेनवरुन पुष्पवृष्टी, कागदी फुलांचा फव्वारा, तोफांची सलामी आणि फटाक्यांची आतषबाजी हे सारं कोणा मंत्री, अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी नाही. तर अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पार्टी या महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम अरुणकाका जगताप यांच्यासाठी सुरु आहे. आमदार जगताप यांच्या प्रचाराचा धुरळा नगर शहर आणि परिसरात चांगलाच उडतो आहे.

चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांना ‘विकास की नैय्या संग्राम भैय्या’ अशा घोषणा नगरच्या गल्लीबोळातून ऐकायला मिळत आहेत. एका अर्थानं आमदार संग्राम जगताप यांची सर्वच नगरच्या नागरिकांना भुरळ पडली आहे.

काल (दि. १०) नगरच्या नालेगाव, रावसाहेब पटवर्धन चौक, धनगरगल्ली आदींसह विविध भागांत प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत सहभागी झालेल्या सर्वच लहानथोर मंडळी, महिला, युवतींनी आमदार संग्राम जगताप यांचं औक्षण करत जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अंत:करणपूर्वक स्वागत केलं. या फेरीत ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार संग्राम जगताप यांचं स्वागत करण्यात आलं. यानिमित्तानं ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

नगरच्या चित्रा गल्ली परिसरात ‘नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री २०२५ मध्ये संग्राम भैय्याच होणार मंत्री’ असा मजकूर लिहिलेल्या आकर्षक रांगोळीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी एका चिमुकल्यानं दिलेल्या घोषणेचं अनेकांनी कौतूक केलं.

अद्भुत क्षमतेचा आमदार…!

विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मतदारांच्या गाठीभेटीसाठी पायाला भिंगरी लावून फिरावं लागतं. मात्र त्यातही काही उमेदवार स्वतःच्या आरोग्याच्या काळजी घेत असतात. मात्र आमदार संग्राम जगताप हे कधीही न थकता दिवसाचे अनेक तास जनतेच्या संपर्कात असतात. अहिल्यानगर शहराला अद्भुत क्षमतेचा आमदार लाभला असून यावेळीही जगताप यांनाच संधी देण्याचा निर्धार नगरच्या मतदारांनी केल्याचं बोललं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या