लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन महाविकास आघाडीची राज्यात सरशी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हाच मोठा पक्ष असणार आहे. या पक्षाला 25 टक्के मतं मिळणार आहेत, असा निवडणूक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार 40 ते 42 जागांवर अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. पुढच्या दोन महिन्यांत जर विधानसभा निवडणूक झाली तर भाजपला या सर्वेनुसार 95 ते 105 जागा मिळतील. शिवसेनेच्या शिंदे गटाला 19 ते 24 जागा मिळतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 7 ते 12 जागा मिळतील. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील. शिवसेनेच्या ठाकरे गटाला 26 ते 31 जागा मिळतील.
दरम्यान, या निवडणुकीत महायुतीला 121 ते 141 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 91 ते 106 जागा मिळू शकतील.
विधानसभेची आत्ता निवडणूक झाली तर भाजपला 25.8 टक्के आठ टक्के मतं मिळतील. शिवसेना शिंदे गटाला 14.2% मतं मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला 5.2% मतं मिळतील. काँग्रेसला 18.6% मतं मिळतील. शिवसेनेच्या ठाकरे गटाला 17.6% मते मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला 6.2% मतं मिळतील. तर अपक्ष आणि इतर पक्षांना 12.4 टक्के मतं मिळतील.
मित्रांनो, खरं तर हा विधानसभेच्या निवडणुकीचा अंदाज आहे. तुम्हाला तर माहित आहेच, की अंदाज हा खरा ठरु करु शकतो किंवा खोटाही असतो. मात्र असे अंदाज हे प्रत्येक निवडणुकीच्या आधी व्यक्त केले जात असतात. ‘टाइम्स नाऊ’ या संस्थेनं केलेल्या निवडणूक अंदाजानुसार महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीचं हे चित्र राहणार आहे. तुम्हाला या अंदाजाविषयी काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.