रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
साधू – संतांनी मतदान करण्याचं केलेलं आवाहन, राज्य सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना या सर्वांचा परिणाम आज (दि. २०) नेवासे तालुक्यातल्या सोनई शहरातल्या विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पहायला मिळाला.
मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचं यावेळी जाणवलं. विधानसभेच्या निवडणुकीसाठी होत असलेल्या या मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत सोनई परिसरातल्या विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर 40% पेक्षा जास्त मतदान झाल्याची माहिती मिळाली.
सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अनेक मतदारांनी सकाळी लवकरच मतदानाचा हक्क बजावला. सोशल मिडियावर मतदान केल्याचे फोटोदेखील अनेक मतदारांनी व्हायरल केले.
मतदान केंद्रांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.