रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघातल्या शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) या संयुक्त महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार फेरीला जगप्रसिद्ध शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या दर्शनानंतर प्रारंभ झाला. महायुतीचे उमेदवार लंघे हे शनिचरणी नतमस्तक झाले.
शनिदेवाच्या दर्शनानंतर लंघे यांनी या परिसरातल्या दुकानदारांच्या भेटी गाठी घेत त्यांना मत देण्याचं आवाहन केलं. दरम्यान, शनिशिंगणापूर नंतर सोनई परिसरात लंघे यांची प्रचार फेरी काढण्यात आली. सोनईसह घोडेगाव, बेल्कहेरवाडी, वंजारवाडी, झापवाडी, पानसवाडी, लोहगाव, वांजोळी, मोरया चिंचोरे, धनगरवाडी आदी भागांत ही फेरी गेली असता लंघे यांनी मतदारांना मतं देण्याचं आवाहन केलं.
महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे, किसनराव (पेशवे) गडाख, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, प्रताप काका चिंधे, प्रमोद कुमावत आदींसह महिला मतदार या फेरीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.