अहिल्यानगरशनिशिंगणापूर पोलिसांनी जप्त केलं बेवारस ड्रोन ; 'चायना मेड' असलेलं हे ड्रोन...

शनिशिंगणापूर पोलिसांनी जप्त केलं बेवारस ड्रोन ; ‘चायना मेड’ असलेलं हे ड्रोन नक्की कोणाचं? पोलिसांचा तपास सुरु… !

Published on

spot_img

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

‘चोरटे आले’, ‘ड्रोन घेऊन ‘पाळत’ ठेवायला आले’, अशा अफवांनी सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काहीशी घबराट पसरली होती. ग्रामस्थांमधून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्यातच शनिशिंगणापूर पोलिसांनी आज (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास शेटे पाटील वस्तीजवळ असलेल्या कपाशीच्या एका शेतात बेवारस ड्रोन जप्त केलं. जप्त केलेल्या या ड्रोनवर कुठल्याही कंपनीचा ‘ट्रेडमार्क’ नव्हता. त्यामुळे हे ड्रोन नक्की कोणाचं, कशासाठी ते आकाशात सोडलं होतं, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, शनिशिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन हे ड्रोन जप्त केलं आहे. चायना कंपनीचं हे ड्रोन असल्याचे सांगण्यात येत आहे. चार ते पाच दिवसांपासून हे ड्रोन बॅटरी संपल्यामुळे कपाशीच्या शेतात पडलं होतं. कपाशी वेचणाऱ्या महिलांना ते दिसलं आणि पोलिसांना संपर्क करण्यात आला.

शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ड्रोनचा पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर हे ड्रोन कोणाचं, याचा उलगडा होणार आहे.

नेवासा पोलिसांनी जप्त केलेलं ‘ते’ ड्रोन खेळण्यातलं…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भेंडा – कुकाणेनजिकच्या लांडेवाडी परिसरात ड्रोन पडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी नेवासा पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे ड्रोन ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, या ड्रोनविषयी विचारलं असता हे ड्रोन खेळण्यातलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिलीय.

आणखी महत्वाच्या बातम्या