अहमदनगर (अहील्यानगर) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश पोटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचं पत्र पोटे यांना नुकतंच देण्यात आलं.
यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, भैय्या परदेशी, किसनराव लोटके सर, गणपत शिंदे, शिवाजी बेरड, प्रवीण वारुळे, गणेश तोडमल, आरिफ पटेल, अमित गांधी, दीपक गुगळे, अक्षय गर्जे, सचिन फल्ले आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल प्रकाश पोटे यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.