वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर जबरी संभोग केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला बलात्कारी डॉक्टर रवींद्र कुटे हा जामीन मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र त्याचं वकीलपत्र घेण्याचा ‘हलकटपणा’ कोण करणार, आणि जो वकील त्याचं वकीलपत्र घेईल, त्या वकिलाच्या मुलीवर किंवा आई- बहिणीवर या डॉक्टरनं जबरी संभोग केला तर त्या वकिलाची भावना काय राहील, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, स्वतःच्या समाजातला वकील यासाठी नियुक्त करायचा विचार बलात्कारी डॉक्टर कुटे हा करत असल्याची माहिती मिळत आहे. वास्तविक पाहता कितीही गंभीर गुन्हा असला तरी नगरचे पोलीस आरोपीच्या ताबडतोब मुसक्या आवळतात. विशेष म्हणजे नगरच्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) पोलिसांचं पथक यासाठी प्रसिद्ध आहे.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीच्या या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. मग बलात्कारी डॉक्टर कुटे हाच पोलिसांना कसा सापडत नाही, हा खरा प्रश्न आहे. बलात्कारी डॉक्टर कुटे हा दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरला येऊन गेल्याची माहिती आहे. वकिलांशी चर्चा करून तो पुन्हा गायब झाला आहे.
पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव?
बलात्कारी डॉक्टर रवींद्र कुटे हा उच्चभ्रू समाजातला असून धनदांडग्या लोकांशी त्याचे संबंध आहेत. मुळात तो प्रचंड श्रीमंत असल्यामुळे कोणालाही सहजासहजी विकत घेऊ शकतो, असा फाजील आत्मविश्वास त्याच्या मनात आहे. असं झालं तर यापुढे गरिबांचा वाली कोणी राहणार नाही आणि सर्वसामान्य जनतेचा पोलीस यंत्रणा आणि कायद्यावरचा विश्वास उडून जाईल. या प्रकरणात कदाचित पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव येत असावा, अशीदेखील शंका व्यक्त केली जात आहे.