अहिल्यानगरश्रीरामपूरच्या बलात्कारी डॉ. रविंद्र कुटेचे 'कुटाणे' ; सविस्तर वाचा फक्त रोखठोक 24...

श्रीरामपूरच्या बलात्कारी डॉ. रविंद्र कुटेचे ‘कुटाणे’ ; सविस्तर वाचा फक्त रोखठोक 24 न्यूज नेटवर्कवरच…!

Published on

spot_img

साधू – संतांचा शाप हा कधीच वाया जात नाही, असं नेहमी म्हटलं जातं आणि ते खरंदेखील ठरत आहे. श्रीरामपूरचा बलात्कारी डॉक्टर रविंद्र कुटे यानं त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर दि. ४ ऑगस्ट रोजी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र बलात्काराची घटना घडताच आरोपी डॉक्टर रविंद्र कुटे हा स्वतःचं तोंड काळं करून पळून गेला आहे.

या बलात्कारी डॉक्टर रवींद्र कुटेचे कुटाणे या बातमीतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. श्रीरामपूर तालुक्यातल्या एका धर्मगुरूला या बलात्कारी डॉक्टर रविंद्र कुटे याने आर्थिकदृष्ट्या फसवलं. त्या धर्मगुरूची जागा खरेदीच्या बहाण्याने गिळंकृत केली.

संतप्त झालेल्या त्या धर्मगुरुनं डॉक्टर कुटे याला शाप दिला, की तुझा दवाखाना यापुढे कधीच चालणार नाही. खरं तर बलात्कारी डॉक्टर कुटे याचा दवाखाना सुरुवातीला श्रीरामपूर शहरात असताना चांगला चालत होता. मात्र त्या धर्मगुरूच्या शापामुळे म्हणा किंवा डॉक्टर कुटे याची नियत फिरल्यामुळे म्हणा. या दवाखान्याला उतरती कळा लागली.

सन २००५ सिंधू रमेश त्रिभुवन या महिलेचा डॉक्टर कुटे हॉस्पिटलमध्ये चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला होता. त्या रुग्णाच्या भाच्याने त्यावेळी डॉक्टर कुटे याच्या विरोधात आमरण उपोषण केलं. विशेष म्हणजे मयत महिलेच्या नातेवाईकांना चार लाख रुपये देण्याचा डॉ. कुटे यानं त्यावेळी प्रयत्न केला होता. मात्र मयत महिलेच्या कुटुंबीयांनी त्याला भीक घातली नाही, हे विशेष. या बलात्कारी डॉक्टर कुटेचा किडनी रॅकेटमध्ये सहभाग असावा, अशीदेखील शंका श्रीरामपूर तालुक्यात व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर बलात्कारी डॉक्टर कुटे याचा हा दवाखाना सील करण्यात यावा, डॉ. कुटे याची सनद रद्द करण्यात यावी, डॉ. कुटे याच्या किडनी रॅकेटच्या कथित सहभागाविषयी सखोल चौकशी करण्यात यावी, डॉ. कुटे याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामपूर तालुक्यातून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या