रोखठोक 24 न्युज नेटवर्क
मुंबई : प्रतिनिधी
सलमानच्या घरावर एप्रिल महिन्यातही पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचं चित्रीकरण राजस्थानमध्ये पार पडलं. या दरम्यान सलमान खानने काळवीटची शिकार केली होती. बिष्णोई समाजात काळविटाला पवित्र स्थान आहे. त्यामुळे सलमानने काळविटाची शिकार केल्याने त्याचा सूड म्हणून आपण सलमानला सोडणार नसल्याचं बिष्णोईनं म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांचे मारेकरी हे बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत असलेल्या घट्ट मैत्रीची किंमत बाबा सिद्दिकी यांना चुकवावी लागली का, याचीही चर्चा आता सुरु झाली आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांची चांगली मैत्री होती. तर, सलमान खान हा बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आरोपी मागील काही दिवसांपासून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी संधीची वाट पाहत होते. अखेर रात्री आरोपीकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी मागील काही दिवसांपासून कुर्ला परिसरात वास्तव्यास होते, अशी देखील सूत्रांची माहिती आहे.