रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत असलेला ऊस प्रवरानगरचा विखे कारखाना नेणार आहे. भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील
यांनी नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.
सोनईच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा बिकट प्रश्न असून या प्रश्नासंदर्भात तुम्हाला सोनईच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लागणार आहे. मुळा कारखाना ऊस लवकर नेत नाही. त्यामुळे उसाच्या खोडक्या होताहेत. शेतकरी वैतागल्यानं ऊस पेटून देताहेत. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत सोनईच्या मुळा कारखान्याच्या
हद्दीत असलेला ऊस तुम्ही न्या, असा प्रस्ताव ऋषिकेश शेटे पाटील यांनी पालकमंत्री विखे यांच्यासमोर ठेवला.
विशेष म्हणजे या प्रस्तावाला पालकमंत्री विखे यांनी तात्काळ मंजुरी दिल्याचं ऋषिकेश शेटे पाटील यांनी रोखठोक 24 न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, उद्यापासून (दि. २८) प्रवरानगरचा विखे कारखाना सोनईच्या मुळा कारखाना हद्दीतल्या ऊसाच्या नोंदी घ्यायला सुरुवात करणार आहे. ज्यांना प्रवरानगर कारखान्याला ऊस द्यायचा आहे, अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ताबडतोब संपर्क साधावा, असं आवाहन ऋषिकेश शेटे पाटील यांनी केलं आहे.
ते म्हणाले ‘मुळा कारखाना ऊसाची नोंद ज्या तारखेला लावतो, त्याच्या अनेक दिवसांनंतरही ऊसाला तोड दिली जात नाही. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर चकरा मारू मारू वैतागून जातात. जे गडाखांच्या विरोधात काम करतात, त्यांच्या ऊसाला तोडणी न देता त्या उसाच्या खोडक्या कशा होतील, याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा संतप्त शेतकऱ्यांनी उभ्या ऊसाला यापूर्वी आग लावून दिलेली आहे. मात्र यापुढे असं होणार नाही. कारण प्रवरानगरचा विखे कारखाना सोनईच्या मुळा कारखाना हद्दीतला ऊस न्यायला तयार आहे.
ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कसलीही चिंता न करता ऊसाची नोंद प्रवरानगर कारखान्याला द्यावी. काही अडचण आल्यास आमच्याशी (मो. नं. 090112 22104) संपर्क साधावा, असंही ऋषिकेश शेटे पाटील यांनी सांगितलं.