अहिल्यानगरसोनईतल्या तिरुपती कॉम्प्लेक्सच्या बांधकामात भ्रष्टाचार? योग्य ती चौकशी करुन संबंधितांविरुद्ध कारवाई...

सोनईतल्या तिरुपती कॉम्प्लेक्सच्या बांधकामात भ्रष्टाचार? योग्य ती चौकशी करुन संबंधितांविरुद्ध कारवाई करा…अन्यथा उग्र आंदोलन…! नगरचे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोठारी यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन…!

Published on

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनई शहरातल्या राहुरी रस्त्यालगतच्या घावटे हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटलच्या मध्यभागी बांधण्यात आलेल्या तिरुपती कॉम्प्लेक्सच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरचे सामाजिक कार्यकर्ते अमोल प्रकाश कोठारी यांनी केला आहे.

कोठारी यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की सन 2011 – 12 मध्ये या तिरुपती कॉम्प्लेक्सचं बांधकाम करण्यात आलं असून यामध्ये काही गाळे आणि वरच्या मजल्यावर हॉल बांधण्यात आला आहे. मात्र हा वरचा मजला बांधण्यासाठी संबंधितांकडे डिस्क्लेरेशन अर्थात घोषणापत्र नाही. या कॉम्प्लेक्समधल्या गाळेविक्रीतही भ्रष्टाचार झाला असून अनेकांची आर्थिक लूट झाली आहे. या भ्रष्टाचाराची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधिताविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोठारी यांनी दिला आहे.

आमदार शंकरराव गडाख यांच्या भुमिकेकडे लागलंय नेवासकरांचं लक्ष!

कोठारी यांनी या निवेदनात असं म्हटलं आहे, की तिरुपती कॉम्प्लेक्सचं हे बांधकाम राजेंद्र गुगळे आणि अमृत चोपडा यांनी केलं आहे. गुगळे हे राज्याचे माजी मृद आणि जलसंधारण मंत्री आणि नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांना नेवासा पंचायत समितीचे सदस्यपदही देण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आमदार शंकरराव गडाख यांच्या भुमिकेकडे नेवासकरांचं लक्ष लागलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या