बाळासाहेब शेटे पाटील
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात अचानकपणे जय शिवसंग्राम पक्षाची ‘एन्ट्री’ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मित्र पक्ष असलेल्या जय शिवसंग्राम पक्षासाठी महायुती वर्सोवा (मुंबई) आणि नेवासा हे दोन मतदारसंघ सोडणार असल्याच्या निर्णयाला जवळपास ‘हिरवा कंदील’ देण्यात आला आहे.
दरम्यान, जय शिवसंग्राम पक्षाकडून महायुतीकडे सात जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यापैकी वर्सोवा (मुंबई) आणि नेवासा हे दोन मतदारसंघ जय शिवसंग्राम पक्षाला देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
खासदार रावसाहेब दानवे
आणि विनोद तावडे यांच्यासोबत जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव शेटे पाटील यांची मुंबईत प्रदीर्घ अशी चर्चा झाली.
या चर्चेची छायाचित्रं ‘रोखठोक 24 न्युज नेटवर्क’च्या हाती लागली आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ आणि वर्सोवा (मुंबई) हे दोन मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या जय शिवसंग्राम पक्षाला सोडण्याची महायुतीची तयारी असल्याचं विश्वसनीय सूत्रांमार्फत सांगण्यात आलं. वर्सोवामधून (मुंबई) जय शिवसंग्राम पक्षाचे दीपक कदम तर स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघातून सुरेशराव शेटे पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
कोण आहेत सुरेशराव शेटे पाटील?
जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुरेशराव शेटे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परिचित आहेत. पांढरीपूल परिसरातल्या हॉटेल लिलियम पार्क उद्योग समुहाचे संस्थापक असलेले सुरेशराव शेटे पाटील हे नेवासे तालुक्यातल्या प्रत्येक गावात एक कुशल संघटक म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत.
सामाजिक क्षेत्रात भरीव असं योगदान देणाऱ्या सुरेशराव शेटे पाटील यांना मानणारा नेवासे तालुक्यात मोठा वर्ग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जय शिवसंग्राम पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेशराव शेटे पाटील हे निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर या मतदारसंघाचं राजकीय चित्र कसं राहणार आहे,
कशा पद्धतीची लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे, याविषयी मात्र सर्वत्र उत्सुकता व्यक्त केली जात आहे.