अहिल्यानगरस्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात अनेक भावी ...! पण एकच प्रभावी ......

स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात अनेक भावी …! पण एकच प्रभावी … शंकरराव यशवंतराव गडाख …!

Published on

spot_img
बाळासाहेब शेटे पाटील 
रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
उमेदवारी अर्ज भरणं, निवडणूक लढवणं लोकशाही प्रणालीनुसार हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. त्यामुळे स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात सध्या अनेक भावी आमदारांचे चेहरे पाहायला मिळत आहेत. असं असलं तरी यामध्ये आजमितीला एकच प्रभावी आमदार दिसत आहेत, ते म्हणजे माजी मंत्री आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकररराव यशवंतराव गडाख. हक्काच्या मतदारांचं स्वतंत्र पॅकेज, माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख
यांची पुण्याई आणि स्वतः शंकरराव गडाख यांची सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेप्रति असलेली अढळ श्रद्धा, निष्ठा या ‘वजनदार’ शिदोरीच्या  आधारावर स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून शंकरराव गडाख आजमितीला 90% निवडून आल्यात जमा आहेत. एका अर्थानं स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात अनेक भावी पण एकच प्रभावी शंकरराव यशवंतराव गडाख असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.  
या मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख मशाल हातात घेऊन निवडणूक लढणार की अपक्ष लढणार, हा अजून तरी अनुत्तरीत असलेला प्रश्न आहे. कारण शंकरराव गडाख अपक्ष निवडणूक लढवू शकणारच नाहीत, असं ठामपणे आज तरी कोणाला सांगता येत नाही.
मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा उद्योग समूह, या मतदारसंघातल्या अनेक सहकारी सोसायट्या, अनेक ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था इतकंच काय, जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान अशी एक नाही अनेक सत्ता स्थानं शंकरराव गडाखांच्या ताब्यात आहेत. शनिशिंगणापूर परिसरातला पानसनाला, भुयारी दर्शन मार्ग आणि अन्य विकासकामं गडाखांच्याच मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहेत. अर्थात या संदर्भात अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र गडाख या सर्वच आरोपांना पुरुन उरले आहेत.
स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात शंकरराव गडाख यांच्याशी तोडीस तोड लढत देईल, असा उमेदवार आज तरी दिसून येत नाही. सर्वच विरोधक हे आजच्या घडीला विखुरल्यासारखे आणि ‘स्वयंभू’ असल्यासारखे दिसताहेत. या सर्वांची आज तरी विधानसभा निवडणुकीसाठी एकवाक्यता नाही. कोण तुतारी फुंकण्याची भाषा करतो. आहे. कोण भाजपचं कमळ फुलविणार असल्याचं बोलतो आहे. पण सर्वच विरोधकांची विखुरलेली ही शक्ती शंकरराव गडाख यांच्या विजयाचं द्योतक आहे, हे विसरुन चालणार नाही.  

आणखी महत्वाच्या बातम्या