अहिल्यानगरस्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात प्रचंड संभ्रमावस्था...! मतदार संघ अदलाबदलीचा निर्णय महायुतीला भोवणार...!...

स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात प्रचंड संभ्रमावस्था…! मतदार संघ अदलाबदलीचा निर्णय महायुतीला भोवणार…! भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते करणार प्रभावती घोगरेंचा प्रचार…! भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

भारतीय जनता पक्षाकडे असलेला स्वतंत्र नेवासा विधानसभा हा मतदारसंघ शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय या मतदारसंघातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अजिबात पटलेला नाही. कार्यकर्त्यांनी ज्या  उमेदवाराची अपेक्षा केली होती, त्या उमेदवाराऐवजी भलत्याच व्यक्तीला तिकीट आणि एबी फॉर्म देण्यात आल्यानं कार्यकर्त्यांचा प्रचंड भ्रमनिरास झाला. मतदार संघ अदलाबदलीचा हा निर्णय नेवाशात महायुतीला चांगलाच भोवणार आहे. भाजपचे शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचा प्रचार करणार आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर घोगरे यांचं स्टेटस ठेवलं आहे.

दरम्यान, स्वतंत्र नेवासा मतदारसंघात यापूर्वी अशी संभ्रमावस्था कधीही पाहायला मिळाली नव्हती. अनपेक्षित मतदार संघाची अदलाबदल आणि नावडत्या व्यक्तीला देण्यात आलेली उमेदवारी यावरुन संभ्रमावस्था असताना भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी आज (दि. २९) अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते नेवाशाकडे निघाले.

घोडेगावमध्ये ऋषिकेश शेटे पाटील यांचे घनिष्ठ मित्र नितीन शिरसाठ आणि मित्र मंडळानं ऋषिकेश शेटे पाटील यांचं फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोषात स्वागत केलं.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऋषिकेश शेटे पाटील यांचं नेवाशात आगमन होताच नेवाशातल्या गणेश मंदीर चौकात त्याचे स्वागत करण्यात आलं. गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ऋषिकेश शेटे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते तहसील कार्यालयाकडे निघाले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ऋषिकेश शेटे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ऋषिकेश शेटे पाटील यांचे वडील वसंतराव शेटे पाटील, नितीन शिरसाठ, विलास आयनूर, रवी आल्हाट,

सचिन भांड, गणेश मुरदारे, अनिकेत आल्हाट तुषार भुसारी, ओमकार शेटे पाटील, प्रमोद घावटे, रामकृष्ण आगळे पाटील, आदीनाथ पटारे, प्रताप कोंगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी ॲडव्होकेट गणेश गारोळे आणि ॲडव्होकेट सुनील मोरे यांनी काम पाहिलं. 

आणखी महत्वाच्या बातम्या