नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या महावितरण कंपनीचा जुन्या वांबोरी रोड परिसरात राहणाऱ्या ठेकेदारानं स्वतःच्या घरी गावठाणच्या ट्रान्सफॉर्मरवर थ्री फेज मोटार चालविण्याचा प्रताप केलाय. या पार्श्वभूमीवर ‘हा’ ठेकेदार सोनईच्या महावितरणचा जावई आहे का? सामान्य ग्राहकांना एक आणि ‘या’ ठेकेदाराला दुसरा न्याय का दिला जातोय? सोनईचं महावितरण कार्यालय या ठेकेदाराला का घालतंय पाठीशी? हे आणि असे अनेक प्रश्न सोनई ग्रामस्थांमधून यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.
सामान्य माणसं चोरुन वीज वापरल्याचं लक्षात येताच महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ताबडतोब छापा टाकून संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करतात मग हा ठेकेदार हत्तीच्या कानातून जन्मला आहे का? महावितरण कंपनीचे कार्यालय याकडे का डोळेझाक करत आहे? या ठेकेदाराला रितसर बिल येते का, हा ठेकेदार वेळच्या वेळी वीजबिल भरतो का, याची सखोल चौकशी कधी होणार असे विचारणा या निमित्ताने होत आहे.
महावितरणचा ठेकेदार असल्यामुळे त्याला वेगळा न्याय व सर्वसामान्य ग्राहकांना वेगळा न्याय असा दुजाभाव करत महावितरणच्या अधिकाऱ्याकडून या ठेकेदारावर इतकी मेहरबानी का, हाच खरा आहे.
‘भाऊ’ आहेत ना पाठीशी! मग अशा बातम्यांना कशाला भाव द्यायचा? निर्लज्ज ठेकेदाराची दर्पोक्ती…!
सोनई महावितरणचा हा ठेकेदार प्रचंड मुजोर आहे. स्वतःला तो फारच शहाणा समजत आहे. राजकीय वळचणीला लपणारा हा ठेकेदार एका ‘भाऊ’च्या पाठबळावर उसनं अवसान आणत आहे. जोपर्यंत भाऊ पाठीशी आहेत, तोपर्यंत अशा बातम्यांना कशाला भाव द्यायचा, अशा प्रकारची वक्तव्यं करणाऱ्या या निर्लज्ज ठेकेदाराची दर्पोक्ती सोनईकरांच्या मस्तकात भिनली आहे.