Uncategorizedसोनईतल्या 'या' पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा घोटाळा ? ठेवीदार आणि खातेदारांमध्ये संभ्रमावस्था!

सोनईतल्या ‘या’ पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा घोटाळा ? ठेवीदार आणि खातेदारांमध्ये संभ्रमावस्था!

Published on

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनई शहरात असलेल्या डॉ. घावटे हॉस्पिटलच्या शेजारी दुसऱ्या मजल्यावर कार्यरत असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थेत तब्बल 80 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची जोरदार चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पतसंस्थेच्या शेजारीच आणखी एक मल्टिस्टेट पतसंस्था असून त्या मल्टिस्टेट पतसंस्थेचंदेखील ‘डबडं’ वाजलं असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत या मल्टीस्टेट पतसंस्थेच्या खातेदार आणि ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.

दरम्यान, डॉ. घावटे हॉस्पिटलशेजारी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मल्टिस्टेट पतसंस्थेत अनेक ठेवीदार आणि खातेदारांनी मोठ्या विश्वासानं त्यांच्या कष्टाचा पैसा अक्षरशः डोळे झाकून ठेवला होता. कदाचित भविष्यात या पैशांवर बऱ्यापैकी व्याज मिळून आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल, अशी स्वप्नं अनेकांनी पाहिली होती. प्रत्यक्षात मात्र ही दिवास्वप्नंच ठरली आहेत.

या संदर्भात संबंधित चेअरमनला फोन करुन वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘मी बाहेर आहे. त्यामुळे सोमवारी आपली भेट होऊ शकणार नाही. पण मंगळवारी तुम्ही भेटायला या. समक्ष भेटीअंती चर्चा करु’, असं सांगण्यात आलं.

नावालाच मल्टिस्टेट पण जिल्ह्याबाहेर एकही शाखा नाही…!

मल्टिस्टेट पतसंस्था याचा अर्थ त्या पतसंस्थेच्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये शाखा कार्यरत असून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या जात आहेत. ठेवींवर चांगल्यापैकी व्याज देण्यात आहे. ठेवींच्या तुलनेत कमीत कमी व्याजदरांमध्ये अशा मल्टिस्टेट पतसंस्थांकडून गरजवंतांना कर्जपुरवठादेखील केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र वास्तव खूप भयानक असून या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या नगर जिल्ह्याच्या बाहेर एकही शाखा नाही.

बुधवारी होतील सर्व ‘पत्ते ओपन’…!

या मल्टिस्टेट पतसंस्थेमध्ये ज्यांनी ज्यांनी पोटाला अक्षरशः चिमटा घेऊन स्वतःच्या आर्थिक गरजा कमी करत मन मारून लाखो रुपये ठेवींच्या स्वरूपात ठेवले, त्या ठेवीदारांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती पहायला मिळत आहे. येत्या बुधवारी या मल्टिस्टेट पतसंस्थेसंदर्भात नावासह अधिकृत माहिती प्रसारित केली जाणार असून त्यानंतर सर्व ‘पत्ते ओपन’ होणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या