Uncategorizedअहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात तोतया अभियंता 'कुमाप'चाच बोलबाला ; ते दोन्हीही...

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात तोतया अभियंता ‘कुमाप’चाच बोलबाला ; ते दोन्हीही इंजिनियर राहिलेत फक्त ‘सांगकामे’ ; प्रिन्सिपल डायरेक्टर या गंभीर बाबीची दखल घेतील का?

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील / अहमदनगर

केंद्र सरकारमधल्या रक्षा मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात ‘कुमाप’ या तोतया इंजिनियरचाच बोलबाला सध्या पहायला मिळत आहे. कुमाप हा इंजिनीयर नसून ड्राफ्ट्समन आहे. मात्र त्याला टेक्निकल विभागाची चांगली माहिती असल्यामुळे तो अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयात एखाद्या कार्यालयीन अधिकाऱ्यासारखाच वावरतो आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दोन ‘पारंपारिक’ इंजिनियर फक्त ‘सांगकामे’च राहिले असून पुण्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर या गंभीर बाबीची दखल घेतील का, असा सवाल भिंगारकरांमधून उपस्थित केला जात आहे.

घराचं बांधकाम करण्यापूर्वी या कार्यालयात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारच्या बांधकाम आराखड्याला मंजुरी घ्यावी लागते. इतर अभियंत्यांकडून या कार्यालयात जर एखाद्या घराच्या बांधकामाचा ‘प्लॅन’ ‘सबमिट’ केला तर तो लगेच ‘रिजेक्ट’ केला जातो. मात्र कुमाप याच्यामार्फत जर एखाद्या नागरिकानं या कार्यालयात ‘प्लॅन’ ‘सबमिट’ केला तर तो ताबडतोब मंजूर केला जातो.

या टेक्निकल बाबींमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन अभियंत्यांना फारसं समजत नसावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कुमापच्याच मार्फत नागरिकांना घराच्या बांधकामाचा ऑनलाइन आणि ऑफलाइईन प्लॅन मंजूर करून घ्यावा लागत आहे. 

विशेष म्हणजे अवघ्या 500 स्क्वेअर फुट बांधकामाच्या प्लॅन मंजुरीसाठी हजारो नव्हे  तर लाखो रुपये घेतले जात आहेत. भिंगारच्या ब्राह्मणगल्लीमध्ये असलेल्या एका व्यापाऱ्याने यासाठी चक्क पाच लाख रुपये मोजले असल्याचा किस्सा भिंगारकरांमध्ये मोठ्या आवडीने चर्चिला जात आहेत.

घराच्या बांधकामाचा प्लॅन तयार करणे, तो एफएसआयमध्ये बसवणे, साईट प्लॅन मंजूर करणे विविध अशा कामांमध्ये या ‘कुमाप’शिवाय पानच हालत नाही. हा कुमाप भिंगारच्या नागरिकांना कॅन्टोन्मेंट ॲक्टची भीती दाखवत सर्रासपणे आर्थिकदृष्ट्या लुटत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुण्यातले प्रिन्सिपल डायरेक्टर या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का, अशी विचारणा या निमित्ताने केली जात आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात कुमापचीच झालीय एकाधिकारशाही!

घराचा बांधकाम आराखडा तयार करणं, त्या आराखड्याला मंजुरी घेणं ही काम प्रचंड जबाबदारीचे आहेत. यासाठी खरंतर कॅन्टोन्मेंट बोर्डात दोन अभियंते नेमले आहेत विशेष म्हणजे या दोन अभियंत्यांची कधीच बदली झाली नाही आणि होणार देखील नाही. मात्र तरीही या कार्यालयात कुमापचाच बोलबाला आहे. हे किचकट काम कोणाला जमत नसल्यामुळे कुमाप याची या कार्यालयात एक प्रकारे एकाधिकारशाहीच तयार झाली आहे. पुण्याच्या प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्यासह अहमदनगर कँटेनमेंट बोर्डाचे अध्यक्ष असलेले ब्रिगेडियर यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या