अहिल्यानगरश्रीगोंद्यातल्या काष्टीच्या 'या' इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलवर नक्की चाललंय काय? बेकायदा सावकाराकडून...

श्रीगोंद्यातल्या काष्टीच्या ‘या’ इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलवर नक्की चाललंय काय? बेकायदा सावकाराकडून विद्यार्थ्यांना मिळतेय जीवे मारण्याची धमकी ; एसपी राकेश ओला यांच्या आदेशानंतरही श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीला मोकाट सोडल्याचा पालकांचा आरोप…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील 

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर

नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बेकायदा सावकार आणि गुंड प्रवृत्तीचा असलेला वैभव सुभाष चौधरी आणि त्याचा सहकारी साई मदने (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे व्याजाने घेतलेले पैसे देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या पार्श्वभूमीवर काष्टीच्या ‘या’ इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलवर नक्कीच चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैभव सुभाष चौधरी या बेकायदा सावकाराकडून काष्टीच्या इंजिनियर कॉलेजच्या होस्टेलवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.

विशेष म्हणजे नगरचे एसपी राकेश ओला यांनी आदेश देऊनही श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीला मोकाट सोडल्याचा आरोप पालकांमधून केला जात आहे.

या संदर्भात नेवासे तालुक्यातल्या खरवंडी इथं राहत असलेल्या सौरभ विजय सुरवसे यांनी नगरचे एसपी ओला यांना दि. २४ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला आहे.

सौरभचा मित्र अथर्व दातीर याला १ लाख रुपयांची आवश्यकता होती. वैभव सुभाष चौधरी याच्याबरोबर सौरभ विजय सुरवसे याची ओळख होती. काही दिवसांनी वैभव सुभाष चौधरी हा इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर गेला आणि सौरभ सुरवसे, अथर्व दातीर आणि नितीन डोईफोडे यांना मारहाण करत डोक्याला गावठी कट्टा लावत पाच लाख रुपये आत्ताच्या आत्ता द्या नाहीतर तुम्हाला मारुन टाकतो, अशी धमकी चौधरीनं दिल्याचं पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे.

वैभव चौधरी आणि सुभाष चौधरी या बाप – लेकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 47 गुन्हे दाखल आहेत. मात्र तरीही पोलिसांनी या दोघांना अटक केलेली नाही. या चौधरीला कोणाचा वरदहस्त आहे, या चौधरीकडे सावकारी करण्याचा परवाना आहे का, या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव गेला किंवा एखाद्यानं फाशी घेतली तर त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दरम्यान, यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो न होऊ शकल्यानं त्यांची प्रतिक्रिया समजली नाही. 

एसपी राकेश ओला यांनी पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड झापलं…!

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैभव चौधरी आणि त्याचा बाप सुभाष चौधरी यांची इतकी दहशत आहे, की श्रीगोंदा पोलीस या दोघांना आतापर्यंत अटक करु शकले नाहीत. दरम्यान, सुरवसे हे दोन दिवसांपूर्वी एसपी ओला यांना भेटले. घडलेली हकीकत त्यांनी एसपी ओला

यांना सांगितली. हा प्रकार समजताच संतप्त झालेल्या नगरचे एसपी राकेश ओला यांनी ‘तुझ्या हद्दीत हा गंभीर प्रकार घडत असताना तू आरोपींना अटक का करत नाहीस? तुझ्यावर कोणाचा दबाव आहे? लवकरात लवकर आरोपींना अटक करुन अहवाल सादर कर’, अशा परखड शब्दांत श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रचंड झापलं.

आणखी महत्वाच्या बातम्या