रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
खासगी रिसॉर्टच्या ठिकाणी ट्रांसफार्मर बसवण्याच्या कामाचं अंदाजपत्रक तयार करुन देण्यासाठी महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यानं 5 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. राकेश पुंडलिक महाजन (वय – 42 वर्ष, पद – सहाय्यक अभियंता, वर्ग -2, म.रा.वि.वि.कं.म. सहाय्यक अभियंता कार्यालय, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर मूळ रा. मु.पो. ताहराबाद, ता. सटाणा, जिल्हा नाशिक सध्या रा. दिपक सोनवणे यांच्या घरी भाडोत्री, नामपूर रोड, डिबी नगर, सटाणा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) असं त्याचं नाव आहे.
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर येथील खासगी रिसॉर्टच्या ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचं काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यानं तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.14/10/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.
सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगानं दि.15/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 5,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.15/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.9420896263, सापळा पर्यवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344 सापळा पथक
पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049, स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9403234142
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.